Friday, 7 May 2021

*राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*मुंबई*- कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, आणि बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महान पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये.

महाराष्ट्रात कोरोनामुळे 124 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे, कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपये मदतनिधी द्यावा, त्यासाठी कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*

No comments:

Post a Comment

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी- उद्धव ठाकरे

शाळेची घंटा वाजली माझे विद्यार्थी माझी जबाबदारी शाळा परत बंद करायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळा...