Showing posts with label मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. Show all posts
Showing posts with label मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. Show all posts

Monday, 4 October 2021

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी- उद्धव ठाकरे

शाळेची घंटा वाजली
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी

शाळा परत बंद करायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विदयार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. मी वारंवार टास्क फोर्सशी बोलतोय. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

▪️मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. 
▪️आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. 
▪️शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. 
▪️आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. 
▪️पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे.
▪️शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या 
▪️मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी. 

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी- उद्धव ठाकरे

शाळेची घंटा वाजली माझे विद्यार्थी माझी जबाबदारी शाळा परत बंद करायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळा...